चाळीसगाव पालिकेची अतिक्रमणावर कारवाई : 120 अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त


Chalisgaon Municipality’s action on encroachment : 120 encroachments finally cleared चाळीसगाव : शहरातील अतिक्रमणाविरोधात नगरपालिकेने धडक मोहिम राबवण्यास सुरूवात केली आहे. गत आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नारायणवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर बुधवार, 3 रोजी धुळे रोड व मालेगाव रोडवरील वाय पॉइंट भागातील सुमारे 120 अतिक्रमणे हटविण्यात आल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

अतिक्रमणात कोंडला शहराचा श्वास
शहरातील मुख्य रस्त्यांवर बेसुमार अतिक्रमण झाल्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांचा श्वास कोंडला गेला आहे. शहरात जागोजागी झालेल्या अतिक्रमणामुळे शहरवासीयांना रस्त्यावर चालणे मुश्कील झाले होते. बेसुमार झालेल्या अतिक्रमणामुळे अवैध धंद्यांना देखील खतपाणी मिळत असल्याने नागरीक प्रचंड त्रासले होते. जनतेचा वाढता रोष लक्षात घेता चाळीसगाव नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटावण्याची मोहिीम हाती घेण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारी तसेच नागरीकांना अडचण ठरत असलेल्या अतिक्रमणे हटावण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात पहिल्या टप्यात शहरातील छत्रपती शिवाजी चौकापासून नारायणवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरील पंचायत समितीच्या आरोग्य विभागा कार्यालया गेट समोरील तसेच धुळे रोड वाय पॉइंटपर्यंतची सुमारे 50 लहान मोठी दुकाने व टपर्‍यांचे अतिक्रण हटविण्यात आले होते.

पुन्हा 120 अतिक्रमणांवर कारवाई
बुधवारी पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली. मालेगाव रस्त्यावरील वाय पॉइन्ट भागातील अतिक्रमण संपूर्ण काढण्यात आले. मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली बांधकाम अभियंता प्रदीप धनके, दिनेश जाधव, प्रेमसिंग राजपूत, सुमीत सोनवणे, नितीन सुयेवशी, अमित सोनवणे, मुकादम किरण मोर यांच्यासह पथकाने हे अतिक्रमण हटवले. धुळे-मालेगाव रोडवरील अतिक्रमण काढल्यानंतर रेल्वे स्टेशन ते घाटरोड बाजार समितीपर्यंतचे अतिक्रमण देखील काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !