चुलत बहिणींवर अत्याचार : आरोपीला अटक

वैजापूर गावातील घटना : आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
चोपडा : तालुक्यातील वैजापूर गावाजवळील एका शेतात दोघा अल्पवयीन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी आरोपी देवेंद्र मोरे (22) यास अटक करण्यात आली आहे. पाच व सहा वर्षीय बालिकांना आरोपीने वैजापूर-मेलाणे रस्त्यावरील एका शेतात नेत अत्याचार केला तर एक चिमुकलीने प्रसंगावधान राखत पळ काढल्याने ती बचावली. दरम्यान, अत्याचार झालेल्यातील एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ असून तिच्या चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




