विहिरीच्या जाळ्यांवर बसून शेतकरी तरुण काम करीत असताना तोल गेल्याने गेले प्राण : न्हावी गावातील शोककळा


Young farmers lost their balance while working on well nets : mourning in Nahavi village यावल : तालुक्यातील न्हावी येथे शेत शिवारामध्ये शेत विहिरीवर लावलेल्या जाळीवर बसून काम करणार्‍या तरुण शेतकर्‍याचा तोल गेल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गिरधर खिलचंद नेहेते (34, न्हावी) असे मयत शेतकर्‍याचे ना आहे.

विहिरीत पडल्याने मृत्यू
गिरधर नेहेते हे न्हावी शिवारातील शेत विहिरीला बसवलेल्या जाळीवर बसून काम करीत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत कोसळले. हा प्रकार मजुर वर्गाच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी नागरीकांना माहिती दिली व तातडीने नागरीकांनी धाव घेऊन नेहेते यांना विहिरी बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. डॉ.मोहिनी भुगवाड्या यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. मयत शेतकरी गिरधर नेहेते यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा असा परीवार आहे.

फैजपूर पोलिसात नोंद
या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बर्‍हाटे करीत आहे. तरूण शेतकर्‍याच्या अशा मृत्यू मुळे गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !