चाळीसगावात आ.बं.हायस्कूलमध्ये वार्षिक अंक हितगुजचे प्रकाश

विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा चढता आलेख म्हणजे हितगुज : नारायण अग्रवाल


चळीसगाव : शहरातील आनंदीबाई बंकट मुलांच्या हायस्कुलमध्ये वार्षिक अंकाचे प्रकाशन मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी नारायण अग्रवाल म्हणाले की, शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांची, विविध स्पर्धा त्यांच्यातील नवनवीन उपक्रमांची दखल या हितगुजमध्ये घेतली जाते त्यातून त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न दरवर्षी या अंकातून दिला जातो याचा संस्थाचालक म्हणून मला अभिमान वाटतो.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रकाशन सोहळ्याला शाळेचे मुख्याध्यापक के.एन.तडवी, उपमुख्याध्यापक बा.बा.सोनवणे, पर्यवेक्षक मिलिंद कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी बापूसाहेब फणसे, ज्येष्ठ शिक्षिका सुनीता कासार, ज्येष्ठ शिक्षक एस.डी.मोरे, कलाशिक्षक चेतन कुर्‍हाडे, डी.के.चव्हाण, मिलिंद देव आदींच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. या अंकाचे संपादन कला शिक्षक दिनेश चव्हाण यांनी केले. सुंदर साजेसे सजावट व मुखपृष्ठ कलाशिक्षक चेतन कुर्‍हाडे यांनी केले आहे. या अंकात सर्व वर्षभरातील विविध उपक्रमांनी माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. अतिशय प्रेरणादायी असा हा अंक असून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आरसा असल्याची भावना शाळेचे चेअरमन योगेश अग्रवाल यांनी व्यक्त केली. संपूर्ण आ.बं.परवाराचे सहकार्य लाभल्याचे संपादक यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !