जळगावात धाडसी घरफोडी : 11 हजारांच्या रोकडसह टीव्ही व दुचाकी लंपास


Daring burglary in Jalgaon : TV and two-wheeler looted with 11 thousand in cash जळगाव : जळगाव शहरातील शिव कॉलनीत कुटूंब पर्यटनासाठी बाहेरगावी गेल्याने बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत 11 हजरांच्यासह रोकडसह घरातील टीव्ही व जुनी दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची साधली संधी
जळगावातील नंदनवन कॉलनीत डॉ.सुशील गुर्जर हे राहतात. त्यांचे मेहुणे व सेवानिवृत्त प्राध्यापक मधुकर श्रावण पाटील (64) व त्यांच्या पत्नी तथा माध्यमिक शिक्षिका विद्या पाटील या शिव कॉलनीतील मधुविश्व, प्लॉट नंबर 83/2, गट नंबर 60 मध्ये वास्तव्यास आहेत. पाटील कुटूंब चंदीगड येथे पर्यटनासाठी गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 29 एप्रिल ते 6 मे दरम्यान बंद घरातून 11 हजारांची रोकड, 20 हजार रुपये किंमतीची होंडा अ‍ॅक्टीव्हा (एम.एच.19 सी.जी.3910) व दहा हजार रुपये किंमतीचा जुना टीव्ही असा ऐवज लांबवला. कुटूंब गावावरून आल्यानंतर चोरी प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ.सुशील गुर्जर यांनी शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !