तोल जावून पडल्याने ट्रक क्लिनरचा मृत्यू


जळगाव : ढाब्यावर जेवण केल्यानंतर ट्रकमध्ये चढताना क्लीनरचा अचानक तोल गेल्याने तो जामिनीवर पडून जखमी झाल्यानंतर त्यास जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू ओढवला. अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार (44, शांती नगर, निजामाबाद, आंध्रप्रदेश) असे मृत क्लिनरचे नाव आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीफ

तोल जावून पडल्याने मृत्यू
अब्दुल गफ्फार हा ट्रक क्लिनर असून मिळेल ते ट्रकवर जावून सामान किंवा कंपनीचा माल पोहचविण्याचे काम करीत होता. मंगळवार, 2 मे रोजी हैदराबाद येथून बिडीने भरलेला ट्रक हा राजस्थान अजमेर येथे जाण्यासाठी निघाला होता. या ट्रकवर चालक अब्दुल फय्युब (निजामाबाद) आणि क्लिनर म्हणून अब्दुल गफ्फार हा देखील होतज्ञ. शनिवार, 6 मे रोजी हा ट्रक मुक्ताईनगर तालुक्याच्या सीमेवर पोहचला. या सीमेवर मेवाड छाबा म्हणून हॉटेलवर जेवणासाठी ट्रक थांबला व जेवणानंतर अब्दुल गफ्फारचे ट्रकमध्ये बसण्यासाठी चढत असताना अचानक त्याचा तोल गेला व तो खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !