हे तर मुंगेरीलालचे डिएनए असलेले नेते : मंत्री सुधीर मुनगंटीवार


This is a leader with Mungerilal’s DNA: Minister Sudhir Mungantiwar जळगाव : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत कुठल्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता असतानाच जळगावात खाजगी कार्यक्रमानिमित्त आलेल्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याबाबत छेडले असता ते म्हणाले की, निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. मूळात ही केसच नाही. सत्तासंघर्ष असता तर आम्ही या कार्यक्रमाला आलो असतो का? असा प्रश्न त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. खासदार संजय राऊत यांच्या टिकेवर त्यांनी हे तर मुंगेरीलालचे डिएनए असलेले नेते असल्याची टिका केली.

सत्याचाच विजय होणार
खासदार संजय राऊत यांनी सरकार पडणार असल्याच्या टिकेबाबत मुगगंटीवार यांना छेडले असते ते म्हणाले की, मुंगेरीलालचे डिएनए असलेले काही नेते राज्यात आहेत. सुप्रीम कोर्टात कोणत्या मॅटरवर केस आहे? असा प्रश्न उपस्थित करीत ते म्हणाले की, असे आमदारांना अपात्र करता येत नाही. उद्या सत्याचाच विजय होणार असून काहीही सत्तासंघर्ष नाही, असेही देखील त्यांनी सांगत जनतेच्या विकासासाठी आम्ही काम करीत आहोत व यापुढेही काम करीत राहू, असे सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !