नशिराबाद गावातील 52 वर्षीय शेतकर्याची गळफास घेत आत्महत्या
A 52-year-old farmer of Nashirabad village committed suicide by hanging himself
नशिराबाद : शहरातील 52 वर्षीय शेतकर्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी एकवाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली रवींद्र राजाराम पाटील (52, रा.नशिराबाद) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
घरी कुणी नसताना घेतला गळफास
रवींद्र पाटील हे नशिराबाद येथील शेतकरी होते मात्र बुधवार, 17 मे रोजी त्यांनी राहत्या घरी कोणी नसताना त्यांनी छताला दोरी लावून गळफास घेतला. दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा घरी जेवणासाठी आला असताना त्याने वडिलांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहताच हंबरडा फोडला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरीक धावत आले. त्यांनी रवींद्र पाटील यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले. शेतकर्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयता शेतकर्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परीवार आहे.
