खिर्डीत शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थीही गहिवरले


The students also got emotional while bidding farewell to the teachers in Khirdi खिर्डी : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणार्‍या शिस्तप्रिय शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळ्याचे घट्ट नाते असते. विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिक्षकांच्या सहवासातच जात असल्याने त्यातून निर्माण झालेल्या जिव्हाळ्यानंतर शिक्षक आपल्यापासून बदलीनिमित्त दूर जात असल्याची माहिती विद्यार्थ्यांना कळताच त्यांच्यात चलबिचल सुरू झाली तर काहींना अश्रू आवरणे कठीण झाले. खिर्डीती उर्दू शाळेच्या तीन शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर निरोप समारंभाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.

विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून शिक्षकही गहिवरले
खिर्डी जिल्हा परीषद उर्दू शाळेवर शिक्षक असलेले आदिल खान, एजाज अहमद, जावेद खान हे तिन्ही शिक्षक दहा वर्षांपूर्वी रुजू झाले होते. त्यांनी काही वर्षातच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. याच दरम्यान त्यांच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला. मात्र विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर आपल्या शिक्षकांची बदली रावेर तर दुसर्‍या दोन शिक्षकांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली असल्याची माहिती विद्यार्थ्यांना कळताच त्यांच्या चलबिचल सुरू झाली. शाळेतील शिक्षक आदिल खान, एजाज अहमद, जावेद खान यांना निरोप समारंभ देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मात्र आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. विद्यार्थी रडत असल्याचे पाहून तिन्ही शिक्षक देखील गहिवरले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक निसार शेख रऊफ व शाळा व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थी, पालकवर्ग व गावाने शिक्षकांना पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !