सुरतमधील वाहन चालकाची गावी येताच शेतात आत्महत्या : कारण गुलदस्त्यात
A young man committed suicide by hanging himself in Lasure पाचोरा : पाचोरा तालुक्यातील लासुरे शेत शिवारात 32 वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.
वाहन चालकाच्या आत्महत्येने हळहळ
लासुरे, ता.पाचोरा येथील सुरज भारत देवरे (32) हा तरुण गुजराथ येथे खाजगी वाहन चालक म्हणून कार्यरत होता. तीन दिवसांपूर्वी सुरज हा लासुरे येथे आला व गुरुवार, 18 मे रोजी लासुरे येथील शेत शिवारात त्याने एका शेतात गळफास घतला. पाचोरा येथील जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने सुरजला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी सुरज यास मृत घोषित केले. या प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरजच्या पश्चात सावत्र आई, एक भाऊ, एक बहीण असा परीवार आहे. सुरजने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झाले नाही.
