डॉ.शिवराज मानसपुरे यांनी मुख्य जनसंपर्क अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला


Dr. Shivraj Manaspure assumed charge as Chief Public Relations Officer भुसावळ : भुसावळ रेल्वे विभागाचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.शिवराज मानसपुरे यांची मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी बदली झाल्यानंतर बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारला आहे. शिवाजी सुतार यांची रेल्वे बोर्डात माहिती आणि प्रसिद्धी संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनीदेखील पदग्रहण केले आहे. अत्यंत शिस्तप्रिय व प्रामाणिक अधिकारी म्हणून डॉ.मानसपूरे यांची ख्याती आहे.

विविध पदांवर केले कार्य
डॉ.मानसपूरे यांनी मध्य रेल्वेवर विभागीय परीचालन व्यवस्थापक, सोलापूर विभाग, उपमुख्य परीचालन व्यवस्थापक, निर्माण विभाग, मुंबई आणि वरीष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक, मुंबई विभाग यासारख्या विविध पदांवर काम केले आहे. सोलापूर विभागातील उत्कृष्ट ट्रेन परीचालन कामगिरीबद्दल त्यांना 2016 मध्ये महाव्यवस्थापक श्रेत्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2019-20 मध्ये मुंबई विभागातील लोकल उपनगरी गाड्या आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या उत्कृष्ट ट्रेन परीचालनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट वक्तशीरता क्षेत्रीय शिल्ड देखील मिळाली आहे. मुंबई विभागावर उपनगरीय सेवा, मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवण्यासाठी मुंबई विभागाची गुणवत्ता सुधारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी उपनगरीय वेळापत्रकाच्या एकत्रीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ज्यामुळे अतिरीक्त उपनगरीय सेवांसाठी मार्ग तयार झाले. ठाणे-दिवा नवीन 5वे आणि 6वे रेल्वे मार्ग पूर्ण करताना या नवीन रेल्वे मार्गांच्या बांधकामासाठी विविध मेंटेनन्स ब्लॉक्सची व्यवस्था करणे आणि त्याच वेळी सुमारे 180 दिवस ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या चालू ठेवणे या कामात त्यांचा मोलाचा वाटा होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !