दीपनगरातील नवीन प्रकल्पाच्या ईमारतीत सेंट्रींग साहित्याला आग
Centering material caught fire in new project building in Deepnagar भुसावळ : दीपनगरातील नवीन 660 प्रकल्पासाठी उभारण्यात येत असलेल्या पीएचपी एनसीबी ईमारतीतील वरच्या मजल्यावरील सेंट्रींग साहित्याला गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. या आगीमुळे वीजपुरवठ्यावर कुठलाही परीणाम झाला नाही मात्र भेल अंतर्गत काम करणार्या कंत्राटदाराचे काहीसे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दीपनगरातील अग्निशमन यंत्रणेने वेळीच धाव आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीचे नेमके कारण अस्पष्ट
दीपनगरातील नवीन 600 प्रकल्पातील पीएचपी एनसीबी ईमारतीच्या सर्वात वरील मजल्यावर भेल अंतर्गत काम करणार्या कंत्राटदाराने आपले सेंट्रींग साहित्य ठेवले होते मात्र गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास या साहित्याला आग लागल्याची वार्ता प्रकल्पात कळताच कामगारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली तर दीपनगर प्रकल्पातीलच अग्निशमन यंत्रणेला पाचारण केल्यानंतर 45 मिनिटांनी आग आटोक्यात आली. या आगीमुळे वीजपुरवठा कुठलाही परीणाम झाला नसल्याचे तसेच महाजेनकोचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे नवीन प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी सांगितले. आगीच्या घटनेची रोकडे यांनी पाहणी करीत माहिती जाणून घेतली. कंत्राटदाराचे सेंट्रींग साहित्य किरकोळ आगीत जळाल्याचे रोकडे यांनी सांगितले .
