यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी हर्षल पाटील बिनविरोध
उपसभापतीपदी बबलू कोळी बिनविरोध : शेतकरी हिताच्या निर्णयांची ग्वाही
Harshal Patil as Chairman of Yaval Agricultural Produce Market Committee यावल : यावल कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती व उपसभापतीची निवड गुरूवारी बिनविरोध झाली. सभापती पदावर भाजपाचे हर्षल पाटील तर उपसभापतीपदी शिंदे गट शिवसेनेचे दगडू उर्फ बबलू कोळी यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर या ठिकाणी सत्ताधारी गटाने जल्लोष केला. विरोधी गटाचे संचालक देखील उपस्थित होते. आगामी काळात शेतकरी हितार्थ सर्वांना सोबत घेऊन कामकाज करू, असे प्रसंगी सभापती पाटील म्हणाले.
पदाधिकार्यांची बिनविरोध निवड
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड गुरुवारी सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण यांच्याकडे सभापती पदासाठी भाजपाच्या वतीने हर्षल गोविंदा पाटील तर उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटा कडून दगडू उर्फ बबलू जनार्धन कोळी यांचे अर्ज प्राप्त झाले होते. सभापती व उपसभापती पदाकरीता प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने दोघा अर्जांची छाननी नंतर निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ. चव्हाण यांनी सभापती व उपसभापती निवड बिनविरोध जाहीर केली. त्यानंतर नवनियुक्त सभापती आणि उपसभापती यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

यांची निवडीप्रसंगी उपस्थिती
बाजार समितीच्या सभागृहामध्ये माजी सभापती हिरालाल चौधरी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, शेतकी संघाचे माजी चेअरमन नरेंद्र नारखेडे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य सविता भालेराव, पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपकअण्णा पाटील, वड्री सरपंच अजय भालेराव, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शिवसेनेचे मुन्ना पाटील, गोटू सोनवणे, विलास चौधरी, अतुल भालेराव, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, भरत चौधरी, गोटू साळुंखेसह मोठ्या संख्येत भाजपा सेना पदाधिकारी उपस्थित होते.
या संचालाकांची उपस्थिती
सभापती निवडीत विरोधी संचालक अशोक चौधरी, सैय्यद युनूस सैय्यद, सुनील बारीसह सत्ताधारी गटाचे दीपक चौधरी, उमेश पाटील, राकेश फेगडे, सागर महाजन, पंकज चौधरी, संजय पाटील, नारायण चौधरी, कांचन फालक, राखी बर्हाटे, उज्जैनसिंग राजपूत, यशवंत तळेले, विलास पाटील, सूर्यभान पाटील यांची उपस्थिती होती.
