घाणखेड गावातील वयोवृद्ध शेतकर्याचा उष्माघाताने मृत्यू
An elderly farmer of Ghankhed Village died of heat stroke बोदवड : उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असताना उन्हाचा फटका बसल्याने बोदवड तालुक्यातील घाणखेड येथील 60 वर्षीय शेतकर्याचा बुधवारी मृत्यू ओढवला. सुरेश पुंडलिक वराडे असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
भर उन्हात शेती काम केल्याने फटका
सुरेश वराडे हे शेती व्यवसायातून कुटूंबाचा रहाटगाडा हाकत होते. सोमवार, 15 मे रोजीदेखील ते नेहमीप्रमाणे शेतात गेले मात्र दुपारच्या वेळीत त्यांना उन्हाचा फटका बसल्याने थकवा आल्यानंतर ते घरी आले व प्राथमिक उपचार करूनही उपयोग न झाल्याने दुसर्या दिवशी दवाखान्यात जाऊन सलाईन लावून उपचार घेतले मात्र बुधवार, 17 मे रोजी पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे व भाऊ वहिनी असा परीवार आहे. .मनूर बु॥ येथील अमरजीत पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यु.पी.वराडे यांचे ते भाऊ होत. बुधवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन
सध्या उन्हाचे तापमान प्रचंड वाढल्याने शेतकर्यांनी व इतर नागरीकांनी ऊन होण्याच्या अगोदर व संध्याकाळी कामे उरकून घ्यावी तसेच कामासाठी दुपारच्या वेळी बाहेर निघू नये व आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताने मृत्यू झाल्याची बोदवड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
