मोठी बातमी : दोन हजारांची नोट चलनातून बंद होणार : 30 सप्टेंबर अखेरची मुदत


Big news: Rs 2000 note to be phased out : September 30 deadline मुंबई : रीझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजारांची नोट मागे घेण्याचा निर्णय घेतला असून ग्राहकांना या नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरचा अवधी देण्यात आला आहे. आरबीआयने 2019 पासून दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. आरबीआयने बँकांना या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. एकाचवेळी केवळ 20 हजार रुपये मूल्याच्या नोटाच बदलता येतील. तर बँका आतापासूनच 2000 च्या नोटा ग्राहकांना देणार नाही.

आरबीआयच्या आदेशाने उडाली खळबळ
2016 मध्ये नोटाबंदीच्या वेळी, भ्रष्टाचार्‍यांच्या घराच्या गाद्या आणि उशांमध्ये दडवलेला किमान चार लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर येईल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा होती. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ 1.3 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला. पण आता नोटाबंदीच्या वेळी जारी करण्यात आलेल्या 500 आणि 2000 च्या नव्या नोटांमधून 9.21 लाख कोटी रुपये नक्कीच गायब झाले आहेत.

केवळ 20 हजारांपर्यंत जमा करता येईल भरणा
आरबीआयने सांगितले की, 23 मे पासून एकावेळी केवळ 20 हजार रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा बदलू किंवा जमा करू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकीची व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय आरबीआय नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी 19 शाखा उघडणार आहे. आरबीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.


कॉपी करू नका.