धुळ्यातील सराफाला दाखवली बंगाली जादू : 11 लाखांच्या दागिण्यांसह कारागीर पसार


Bengali magic shown to dusty bullion: Artisan Pasar with jewelery worth 11 lakhs धुळे : पश्चिम बंगालच्या सुवर्ण कारागीराने शहरातील एका सराफाला 11 लाखांचा चुना लावत 172 ग्रॅम सोने लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सराफ व्यावसायक केयूर शहा (रा. अग्रवालनगर, धुळे) यांनी धुळे शहर पोलिसात तक्राद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

दागिण्यांसाठी नेले सोने
शहा यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवार, 5 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्यासुमारास शहरातील त्यांच्या मालकीच्या एस. कांतीलाल अ‍ॅण्ड ज्वेलर्स या दुकानातील अमिरुद्दीन वाहीद मलिक (34, रा.शिवाजीनगर, झोपडपट्टी, धुळे) या सुवर्ण कारागीराने 10 लाख 98 हजार 328 रुपये किंमतीचा 171.99 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा दागिने घडविण्यासाठी घेतला मात्र दागिने न करता तुकडा घैवू नपळ काढला. सुरुवातीला त्याचा शोध घेण्यात आला पण कारागीराचा शोध न लागल्याने सराफ व्यावसायिक शहा यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. तपास नाईक ए.एस.बागुल करीत आहेत.


कॉपी करू नका.