भुसावळातील तरुणीची सोशल मिडीयावर बदनामी : एकाविरोधात गुन्हा


Defamation of Bhusawal girl on social media : Crime against one भुसावळ : खाजगी नोकरी करणार्‍या 28 वर्षीय तरुणीची सोशल मिडीयावर फेक अकाउंट बनवून बदनामी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात खातेधारकाविरोधात गुन्हा
भुसावळ शहरातील 28 वर्षीय तरुणी शहरातील एका भागात वास्तव्यास असून खाजगी नोकरी करून ती कुटूंबाला हातभार लावते. संशयित आरोपीने बनावट सोशल मिडीयावरील खाते बनवले व फिर्यादीच्या इन्स्टाग्रामवरील खात्यावर काही पुरूष व महिलांचे नग्न अवस्थेतील फोटो टॅग करीत तरुणीची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने जळगाव सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !