लोणच्या वीर जवान जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


Cremation of the brave soldier of Loannkhurd  with state honors अमळनेर : अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द गावातील लिलाधर शिंदे या जवानाला कर्तव्यावर असताना वीरगती प्राप्त झाल होती. जवानाच्या मृतदेहावर शनिवारी शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.

अपघातात जवानाला वीरगती प्राप्त
आसाम येथे कर्तव्यावर असताना सैन्य दलात कार्यरत असलेल्या लिलाधर शिंदे हा जवान सैन्याच्या वाहनातून जात असताना ट्रकचे मागील फाटक पहाडातील रस्त्यावर तुटल्याने शिंदे यांचा जखममी झाल्यानंतर मृत्यू झाला होता. ही घटना मंगळवार, 16 रोजी घडली होती. वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकाचे पार्थिव शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास लोण गावात आल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातून एक किलोमीटर अंतरापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली तर लष्कराच्या ताफ्यात सजावट केलेल्या वाहनातून जवानाची अंत्ययात्रा निघाली. मृत जवानाच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.


कॉपी करू नका.