मुक्ताईनगरात वाढदिवसालाच नऊ वर्षीय बालिकेचा शॉक लागल्याने मृत्यू
A nine-year-old girl died of shock on her birthday in Muktainagar मुक्ताईनगर Muktainagar : घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना नऊ वर्षीय बालिकेला कुलरचा शॉक लागला व यात तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता मुक्ताईनगर शहरातील जिजाऊ नगरात घडली. वैष्णवी चेतन सनान्से (9) असे मयत मुलीचे नाव आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
ऐन वाढदिवसाच्या दिवशी काळाने तिच्यावर घाला घातल्याने शहरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. शुक्रवारी वैष्णवीचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत कुटूंब रंगले होते मात्र सायंकाळच्या सुमारास कुलरचा चिमुकलीला शॉक लागला व तिचा मृतयू झाला. शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैष्णवी ही चेतन महाराज यांची कन्या होय.
