वांजोळा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत इंदुबाई मोरे विजयी


Indubai More won in the by-election of Vanjola Gram Panchayat भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वांंजोळा येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीनमध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत इंदुबाई मोरे व उज्वला बहिरम यांच्यात सरळ लढत झाली. त्यात 11 मतांनी इंदुबाई मोरे यांचा विजय झाला.

निकानंतर उमेदवार समर्थकांचा जल्लोष
मोरे यांना 60 तर प्रतिस्पर्धी बहिरम यांना 49 मते मिळाली. गुरुवारी झालेल्या निवडणुकीनंतर शुक्रवारी तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजता मतमोजणी झाली तर पाचच मिनिटात निकाल हाती आला. निकालानंतर उमेदवार मोरे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी निवासी नायब तहसीलदार शोभा घुले, निवडणूक निर्णय अधिकारी फिरोज खान, भाऊसाहेब शिरसाठ, योगेश मुस्कावाड आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !