त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी

यावल तहसील कार्यालयात महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून निवेदन


यावल : नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात महादेवास काही धर्मांधांकडून हिरवी शाल घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तहसील कार्यालयामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देवून करण्यात आली.

धर्मांधांवर कारवाईची मागणी
यावल तहसील कार्यालयामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वय सुनील घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या त्यांनी म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर मंदिर परीसरात स्थानिक उरुसाच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत काही धर्मांधांनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट धरला. हे धर्मांध एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी महादेवाच्या पिंडीवर हिरवी शाल चढवण्याचा आग्रह केला. या प्रकारानंतर सुरक्षा रक्षकांनी या धर्मांधांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला. वास्तविक पाहता श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घटनेप्रमाणे दर्शनाचे अधिकार हे हिंदू धर्मातील व्यक्तींनाचं देण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे स्थान हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असून ही घटना गंभीर आहे व या प्रकारामुळे जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना लखन नाथ, योगेश वारुळकर, उज्वल कानडे, रीतेश बारी, संदीप रेघे, राजेश बारी, सागर इंगळे, सागर फेगडे, पराग भोईटे, दीपक फेगडे, कोमल इंगळे, साहिल चव्हाण, स्नेहल फिरके, प्रथमेश घोडके, युवराज बारी आदींची उपस्थिती होती.-


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !