जळगावातील तरुणीचे लग्न मोडत बदनामी करून वधू पित्याची चार लाखात फसवणूक
Bride’s father was cheated of four lakhs by defaming the marriage of a young woman in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील एका भागातील प्रौढ व्यक्तीच्या मुलीची समाजात बदनामी करून झालेला साखरपुडा व ठरलेले लग्न खोटे आरोप लावून मोडून टाकण्यात आले व या माध्यमातून वधू पित्याची चार लाखात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शनिवार, 20 मे रोजी रात्री 9 वाजता शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
साखरपूडा मोडत तरुणीची बदनामी
शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील एका भागात 45 वर्षीय व्यक्ती आपल्या परीवारासह वास्तव्याला आहेत. त्यांच्या मुलीचा साखरपुडा समाजाच्या मुलाशी झालेला होता. दरम्यान, मुबीन सत्तार काकर, सत्तार अहमद काकर, रईसा सत्तार काकर, शोएब शेख अजीज आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी मिळून प्रौढ व्यक्तीच्या मुलीची समाजात बदनामी केली. एव्हढेच नाही तर झालेला साखरपुडा आणि ठरलेले लग्नदेखील मोडून चार लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात प्रौढाच्या तक्रारीवरून मुबीन सत्तार काकर, सत्तार अहमद काकर, रईसा सत्तार काकर, शोएब शेख अजीज आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.


