पाणी पिण्याच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीशी अश्लील वर्तन : आरोपी तरुणाला अटक
Indecent behavior with minor girl on the pretext of drinking water: Accused youth arrested नशिराबाद : नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाणी मागण्याच्या बहाण्याने संशयित आरोपी नरेंद्र वाल्मीक सोनवणे (जळगाव तालुका) याने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी संशयिताविरोधात अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
पाण्याचा बहाणा करीत विनयभंग
मध्यप्रदेशातील एका गावातील गरीब कुटूंब रोजगारानिमित्त नशिराबाद परीसरातील एका शेतात वास्तव्यास आहे. या कुटूंबातील अल्पवयीन 16 वर्षीय मुलगी घरी असताना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संशयित नरेंद्र सोनवणे याने पाणी मागण्याचा बहाणा करीत झोपडीवजा घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. आई-वडील घरी आल्यानंतर मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने दुसर्या दिवशी शनिवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.


