हॉटेलमध्ये बसू देण्याच्या वादातून जळगावात हॉटेल चालकाला मारहाण


A hotel driver was beaten up in Jalgaon due to a dispute over letting him sit in a hotel जळगाव : शहरातील रामानंदनगर भागातील गिरणा पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये बसू देण्याच्या कारणावरून हॉटेल व्यावसायीकाला शिवीगाळ करून मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉटेल चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा
किरण रमेश अहिरे (32, रा.रायसोनी नगर) यांचे रामानंदनगर भागात असलेल्या गिरणा पाण्याची टाकीजवळ हॉटेल आहे. या ठिकाणी गुरुवार, 18 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास दत्तू कोळी आणि त्याच्यासोबत इतर दोघा-तिघांनी येत हुल्लडबाजी केली. हॉटेल मालक किरण अहिरे यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच हॉटेलवर दगडफेक केली. यावेळी हॉटेलमधील कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करून दहशत निर्माण करण्यात आली. या प्रकरणी हॉटेल मालक किरण अहिरे यांच्या फिर्यादीवरून दत्तकडी यांच्यासह इतर दोन ते तीन अनोळखीविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !