भुसावळातील दोघा तरुणांचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू


Two youths in Bhusawal died due to drowning in hot water tank भुसावळ : शहरातील खडका रोड, ग्रीन पार्क भागातील पाच तरुण सुटीनिमित्त शहरातील राहुल नगर भागातील तापी नदीपात्रात पोहण्यासाठी रविवारी सायंकाळच्या सुमारास आल्यानंतर पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे अल्पवयीन बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर सुदैवाने तिघे काठावरच पाण्यात पोहत असल्याने बचावले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

शहरात उडाली खळबळ
शेख दानीश शेख जाबीर (17, रा.ग्रीन पार्क, 32 खोली, भुसावळ) व अंकुश दौलत ठाकूर (17, ग्रीन पार्क, 32 खोली, भुसावळ) अशी मृतांची नावे आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सुदैवाने तिघे बचावली
खडका रोड, जामनेर रोड भागातील पाच तरुण रविवारच्या सुटीनिमित्त पोहण्यासाठी राहुल नगर भागात तापी पात्रात गेल्यानंतर तीन मुले तापीच्या काठावरच पाण्यात पोहत होती मात्र शेख दानीशसह अंकुश ठाकूर हा तरुण पोहताना खोल पाण्यात गेल्याने बुडू लागल्याने काठावरील तरुणांनी आरडा-ओरड केली मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. पट्टीच्या पोहणार्‍यांना मयत युवकांचा मृतदेह बाहेर काढला. तरुणांना डॉ.राजेश मानवतकर यांच्याकडे हलवले असता त्यांनी तपासून मृत घोषित केले.


कॉपी करू नका.