रायपूरात विवाहितेवर प्राणघातक हल्ला, गोळी मारण्याची धमकी : वडिलांनाही मारहाण


Assault on married woman in Raipur, threatening to shoot: Father also beaten सावदा : रावेर तालुक्यातील रायपूर गावातील 40 वर्षीय विवाहितेसह तिच्या वडिलांवर सीमकार्ड परत देण्याच्या कारणावरून दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
रायपूर येथील विवाहिता सुरत येथे वास्तव्यास असून ती सध्या माहेरी आली आहे. संशयित आकाश जीवन मोहोसे व व रोहन जीवन मोहोसे (दोन्ही रा.रायपूर) यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विवाहितेकडे येत आकाशने आपले सीमकार्ड देण्याची मागणी केली मात्र त्यावरून शाब्दीक वाद वाढतच गेल्याने संशयितांनी विवाहितेचा विनयभंग केला तसेच विवाहितेसह तिच्या वडिलांच्या डोक्यात कोणत्यातरी हत्याराने हल्ला करीत जखमी केले तसेच विवाहितेचा मोबाईल फोडून शिविगाळ करून जेलमधून सुटल्यावर गोळीने ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विवाहितेने केल्यावरून सावदा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अन्वर तडवी करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !