नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवरच केला अत्याचार : रावेर तालुका हादरला
A murderous father abused a minor girl: Raver taluka was shaken रावेर :सावदा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील नराधम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवरच अत्याचार केल्याची माणसुकीला काळीमा फासणारी घटना रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करीत असून नराधम पित्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून नराधम पिता तथा आरोपी उत्तम गुरुदयाल राठोड (रावेर तालुका) याच्याविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नराधम पित्याने केला अत्याचार
पिता-पूत्राचे पवित्र नात्याला काळीमा फासत नराधम पिता उत्तम राठोड याने रविवारी सकाळी 13 वर्षीय पीडीता भांडे धूत असताना तिला पलंगावर ओढत तिच्यावर अत्याचार केला. पीडीतेने आरडा-ओरड केल्याने शेजारील लोक जमा झाले व त्यांनी पीडीतेची सुटका देत नराधमाला चोपून काढल्याने त्याने पळ काढला.या प्रकरणी सावदा पोलिसात धाव पीडीतेने तक्रार दिल्यानंतर नराधम बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.
A murderous father abused a minor girl : Raver taluka was shaken


