आव्हाणे गावात चोरटे सैराट : एकाचवेळी तीन घरे फोडली
Thieves raid in Avhane village: Three houses were broken into simultaneously जळगाव जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात एकाचवेळी चोरट्यांनी तीन घरे फोडल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामस्थांमध्ये पसरली भीती
जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातील सरुआई नगरातील तुषार सपकाळे, साहेबराव नारायण पाटील व प्रताप जिभाऊ नगरातील भागवत इंगळे यांच्याकडे चोरी झाली तसेच सरुआई नगरातीलच मच्छिंद्र पाटील यांचे घरदेखील फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. रविवारी सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. तुषार सपकाळे यांच्या नातेवाईकाकडे गावातच लग्न असल्याने सपकाळे हे रात्री घर बंद करून लग्न घरी गेल्याने तसेच साहेबराव पाटील हे आपल्या परीवारासह बाहेर गावी गेल्याने बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केले. काळ्या रंगाच्या रीक्षातून चोरटे आल्याचा संशय आहे.
सोन्या-चांदीचे दागिणे लांबवले
तुषार सपकाळे यांच्या घरातून सोने-चांदीसह 25 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला तर साहेबराव पाटील यांच्या घरात मुद्देमाल हाती लागला नाही मात्र लहान मुलांचे गल्ले लांबवण्यात आले तर भागवत इंगळे यांच्या घरातून दोन तोळे सोने व पाच हजारांची रोकड लांबवण्यात आली.


