पाळधीत जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी : चौघे जखमी


Clashes broke out between two groups due to an old dispute in Paldh : Four injured पहूर : जामनेर तालुक्यातील पाळधी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होवून दोन्ही गटातील चौघे जखमी झाले. ही घटना शनिवार, 20 मे रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. एका गटाच्या तक्रारीवरून 15 जणांविरोधात तर दुसर्‍या गटाच्या सात अशा एकूण 22 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून तिघांवर हल्ला
विकास शंकर पारधे (50, पाळधी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा दीपक याच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्यासह मुलगा दीपक शंकर पारधे (19), लिलाबाई रामा बाविस्कर (70) यांना लाकडी काठ्या, लोखंडी सळई, कुर्‍हाडे, दगडी, लोखंडी चाकूने हल्ला करून मारहाण करण्यात आली. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी संशयित संदीप दामू ठाकरे, राहूल पंडीत भोई, गणेश भोई, दिलीप भील, दीपक भानूदास धनगर, रमेश भानुदास धनगर, सुभाष भील, मनोज उत्तम गायकवाड, अशोक धोंडू धनगर, सुनील आत्माराम ठाकरे, शिवाजी भील, गीताबाई भील, सखूबाई भोई, सुमनबाई बाबूलाल भोई, हिराबाई भानूदास धनगर (सर्व रा.पाळधी, ता.जामनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍या गटात सात संशयितांविरोधात गुन्हा
दुसर्‍या गटातर्फे सुनील आत्माराम ठाकरे (भील, 30, पाळधी, ता.जामनेर) यांच्या तक्रारीवरून विकास शंकर पारधे, दीपक विकास पारधे, नाना रामा बाविस्कर, मयूर विकास पारधे, समाधान सीताराम बाविस्कर, ज्योतीबाई विकास पारधे, लिलाबाई रामा बाविस्कर (सर्व रा.पाळधी, ता.जामनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाकरे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे मित्र आकाश भोई यांचे
संशयित आकाश भोई याच्याशी भांडण झाल्यानंतर ते पोलीस ठाण्यात गेल्याचा राग आल्याने संशयितांनी घरात शिरून हल्ला केला तसेच मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी व हवालदार युनूस शेख करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !