पिंपळकोठ्यातील तरुणाचा गिरणा नदीत पोहताना बुडून मृत्यू


Pimpalkotha youth drowned while swimming in Girna river जळगाव : गिरणा पात्रात पोहत असताना तरुणाला फिट आल्याने तरुण पाण्यात बुडून मयत झाला. ही घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राजू भूरा भील (35, पिंपळकोठा, ता.एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पाण्यात पोहताना आले फिट
राजू भील हा तरुण आपल्या परीवारासह पिंपळकोठा येथे वास्तव्याला होता. त्याला फिटचा आजार होता. रविवार, 21 मे रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला असता अचानक फिट आल्याने त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !