वरणगाव शहरातून 20 हजारांच्या बकर्या लांबवल्या
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील गौसिया नगर भागातून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीच्या तीन बकर्या लांबवल्या. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
तक्रारदार तथा रीक्षा चालक शेख तौसीफ शेख अल्लाउद्दीन (29, गौसियानगर, वरणगाव) यांच्या तक्रारीनुसार, रविवार, 21 रोजी दुपारी तीन ते साडेपाच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराजवळून 20 हजार रुपये किंमतीच्या तीन बकर्या लांबवल्या. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मागर्र्दर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.
