शेती वादातून कुंवरखेड्यातील रीक्षा चालकाची आत्महत्या


Suicide of a rickshaw driver in Kunwarkheda due to agricultural dispute जळगाव : शहरातील कासमवाडीतील रीक्षा चालकाने शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, 23 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. संजय चावदस सपकाळे (55, रा.कुंवरखेडा, ता.जि. जळगाव, ह.मु.कासमवाडी जळगाव) असे मयताचे नाव आहे.

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
रीक्षा चालक सपकाळे हे आपल्या पत्नी, मुलीसोबत वास्तव्याला होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतातील हिस्से वाटणीवरून पाच भावांमध्ये वाद सुरू होता. इतर भावांना शेतातील वाटेहिस्से देण्यात आले होते परंतु संजय सपकाळे यांना शेतातील कुठलाही हिस्सा देण्यात आला नसल्याने हिस्सा मिळण्यााठी त्यांचे भावांशी भांडण होते. मंगळवारी सकाळी शेतीच्या हिस्से वाटेवरून वाद झाल्यानंतर शेती देण्यास नकार मिळाल्यानंतर संतापाच्या भरात संजय सपकाळे यांनी आसोदा रेल्वे फाट्याजवळ रीक्षा बाजूला लावून चालक गजानन आधार सोनवणे यांना फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी आसोदा रेल्वेगेटजवळ धाव घेतली. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रघुनाथ महाजन यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत संजय सपकाळे यांची पत्नी कल्पना व मुलगी खुशी यांनी केली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !