चाळीसगावात दोन किलो गांजासह आरोपी जाळ्यात
चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी : गोपनीय माहितीवरून कारवाई
Accused in Chalisgaon city with ganja in city police net चाळीसगाव गांजा : शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून 43 हजार 900 रुपये किंमतीचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जगदीश जगन्नाथ महाजन (52, नेताजी चौक, चाळीसगाव) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महसूल नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, सहा.निरीक्षक सागर ढिकले, हवालदार योगेश बेलदार, चालक नितीश वासुदेव पाटील, मुद्देमाल कारकुन सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, विनोद विठ्ठल भोई, दीपक प्रभाकर पाटील, भटु पाटील, राहुल सोनवणे, प्रवीण जाधव, विनोद खैरनार, निलेश पाटील, अमोल युवराज भोसले, रवींद्र निंबा बच्छे, संदीप बाळासाहेब पाटील, नंदकिशोर शिवराम महाजन, आशुतोष दिलीप सोनवणे, नरेंद्र किशोर चौधरी आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व कॉन्स्टेबल उज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.


