धुळ्यात वहिनीला अत्याचार केल्यानंतर पेटवले : आरोपीला बेड्या


Sister-in-law set on fire after torture in Dhule:  Accused shackled धुळे : शहरातील पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयाजवळील नाल्यात रविवारी रात्री 8 ते सोमवारी पहाटे 2.30 वाजेदरम्यान आरोपीने आपल्याच वहिनीवर अत्याचार करून तिला पेटवले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेतील महिलेने आझादनगर पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

जिवंत जाळण्याचा प्रयत्न
धुळे तालुक्यातील एका गावातील संशयित आरोपी असलेल्या दिराने आपल्या वहिनीला गावाहून धुळ्याकडे बोलावत तिला पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयाजवळ असलेल्या नाल्याजवळ नेले. रविवारी रात्री 8 ते सोमवारी पहाटे 2.30 वाजेदरम्यान तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करीत तिला बांधून ठेवले. एवढ्यावरच न थांबता त्या नराधमाने दुचाकीमधील पेट्रोल काढले आणि तिच्या अंगावर टाकून पेटवून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पेटल्यानंतर जिवाच्या आकांताने पीडित महिला मदतीसाठी आरडा ओरड करू लागली. आवाज ऐकून कृषी महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी, आझादनगर पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आरोपीला अखेर अटक
पोलिसांनी तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या पीडित महिलेवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आली.


कॉपी करू नका.