जळगावच्या फुले मार्केटमध्ये आलेल्या महिला शिक्षकाकडील 70 हजारांची रोकड लांबवली


70,000 cash from the female teacher who came to Jalgaon’s Phule Market was delayed जळगाव : शहरातील गजबजलेल्या फुले मार्केटमध्ये आलेल्या शिक्षक महिलेच्या पर्समधील 70 हजारांची रोकड भामट्यांनी लांबवली. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता घडली. याप्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर गुरुवारी रात्री जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पर्समधून लांबवली रोकड
शिक्षक शुभांगी सुरेश बडगुजर (42, पिंप्री खुर्द, ता.धरणगाव) या शनिवार, 20 मे रोजी कामानिमित्त शहरातील फुले मार्केटमध्ये आल्या असता चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील 70 हजारांची रोकड लांबवली. हा प्रकर त्यांनी कुटूंबियांनी सांगितल्यानंतर गुरुवारी या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक योगेश बोरसे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !