जामनेरात दुकान उघडताना चोरट्यांनी सव्वाचार लाखांची रोकड लांबवली


While opening a shop in Jamner, the thieves made away with cash worth Rs.four lakh जामनेर : जामनेर तहसील कार्यालयासमोर व्यावसायीक दुकान उघडत असताना पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी चार लाखांची रोकड असलेली बॅग भर दिवसा लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

नजर हटताच लांबवली बॅग
उल्हास अशोक पाटील (37, वाकी खुर्द, गोंडखेड, ता.जामनेर) यांचे जामनेर शहरातील तहसीलसमोर बीओटी कॉम्प्लेक्समध्ये हरीओम ट्रेडर्स नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे गुरुवार, 25 रोजी सकाळी 9.5 वाजता दुकान उघडत असताना त्यांनी चार लाखांची रोकड असलेली बॅग व त्यात 15 हजारांचा मोबाईल बाजूला ओट्यावर ठेवला असता काही क्षणातच दोघा भामट्यांनी बॅग लांबवली. व्यापार्‍याने आरडा-ओरड केली मात्र तो पर्यंत संशयित पसार झाले. व्यापारी उल्हास पाटील यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलिसात गुन्ह दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक डी.मोहिते करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !