घाटात दुचाकी कोसळली : साक्री तालुक्यातील दोघे ठार


Two-wheeler falls in the ghat : two people from Sakri taluka are killed साक्री : साक्री तालुक्यात झालेल्या अपघातात कोकले, ता.साक्री येथे दोघांचा मृत्यू झाला. साक्री तालुक्यातील हिंदाईबारी घाटात उतारावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्यानंतर दुचाकी दरीत कोसळल्याने हिरामण भीमराव शिंदे (40, रा.कोकले, ता.साक्री) व दादाभाऊ शामराव ठाकरे (33, रा.कोकले, ता.साक्री) यांचा मृत्यू झाला.

नियंत्रण सुटल्याने अपघात
शिंदे व ठाकरे हे दुचाकी (जीए 03 एम 6862) वरून जात असताना घाटात नियंत्रण सुटल्याने दुचाकी दरीत कोसळली. गुरुवारी सकाळी हा अपघात झाल्यानंतर रात्री उशिरा अपघाताची नोंद करण्यात आली. या प्रकरणी ओंकार शिवाजी पवार (रा.कोकले, ता.साक्री) यांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.


कॉपी करू नका.