दुकान चालवायचे असेल तर खंडणी द्यावीच लागेल ! : पहूरमधील संशयिताला बेड्या


Suspect demanding extortion from shopkeeper in Pahoor पहूर : ईलेक्ट्रीक दुकान चालू ठेवण्यासाठी एक हजारांची मागणी करत दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली तसेच दुकानदाराच्या खिशातील एक हजारांची रक्कम घेवून पळ काढणार्‍या संशयिताविरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्यास अटक केली आहे. प्रदीप उर्फ मास रामदास पाटील (पहूर, ता.जामनेर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

खंडणी मागत काढला पळ
जफरखान पठाण (33, पहूर पेठ, ता.जामनेर) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पहूरपेठ भागात जामा मस्जीद येथे ईलेक्ट्रीक दुकान आहे. गुरूवार, 25 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करत असतांना दुकानावर संशयित आरोपी प्रदीप पाटील हा आला. दुकान चालवायचे असेल तर मला पैसे द्यावे लागतील असे सांगून पठाण यांना बेदम मारहाण करण्यास त्याने सुरूवात केली व त्यांच्या खिश्यातून एक हजार रुपये काढून पळ काढला. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रदीप पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार रवींद्र देशमुख करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !