जळगावातील विवाहितेची पोत धूम स्टाईल लांबवली
Jalgaon bride’s dhoom style texture extended जळगाव : धूम स्टाईल चोरट्यांचा अलीकडेच बंदोबस्त करण्यात आल्यानंतर पुन्हा शहरात या पद्धत्तीने चोर्या होवू लागल्याने महिलावर्गात भीती पसरली आहे. जळगावच्या शहरातील नंदनवन कॉलनी परीसरात तारा हॉस्पिटल समोरून शतपावली करणार्या महिलेच्या गळ्यातील 65 हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगल पोत दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी लांबवली. या प्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धूम स्टाईल येत लांबवली पोत
रींग रोड परीसरातील फॉरेस्ट कॉलनीत ज्योती विजय शिरसाठ (38) या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे ज्योती शिरसाट या त्यांच्या शेजारी राहणार्या भारती प्रवीण पाटील यांच्यासोबत शतपावली करण्यासाठी शुक्रवारी रात्री 10 वाजता पायी निघाल्यानंतर नंदनवन कॉलनीतील तारा हॉस्पिटल समोरून जात असताना मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर आले व त्यांनी ज्योती शिरसाठ यांच्या गळ्यातील 65 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. महिलेने आरडा-ओरड केली मात्र क्षणात चोरटे गायब झाले. महिलेने शनिवार, 27 मे रोजी दुपारी 12 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


