पोलीस असल्याचे सांगत शेतकर्‍याला अडवले ; बोलण्यात गुंतवत गोंदेगावच्या शेतकर्‍याकडील एक लाख लांबवले


Fake cops extort lakhs from farmer जामनेर : तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळ पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात दोन जणांनी वृध्द शेतकर्‍याजवळील जबरीने एक लाख रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पहूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा
जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथे कौतीक विठ्ठल ठाकरे (72) हे वयोवृत्त आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, 26 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतीचे पीक कर्जाचे एक लाख रुपये पिशवीत ठेवून घरी जात असताना अज्ञात दोन जणांनी त्यांचा रस्ता अडवला व आपण पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर कौतीक ठाकरे यांच्याजवळील पिशवीतील एक लाख रुपयांची रोकड घेऊन घेऊन संशयितांनी पळ काढला. ही घटना घडल्यानंतर वयोवृद्ध शेतकरी यांनी पहूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर शनिवारी रात्री 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !