भडगाव तालुक्यातील प्रौढाचा दुचाकी अपघात मृत्यू


पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात दोन दुचाकींमध्ये धडक झाल्याने कोठलीतील 58 वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात दोन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. संजय रतन पाटील (58, कोठली) असे मयताचे नाव आहे.

दुचाकी धडकेत जागीच र्मतयू
शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकलींची धडक झाली. या अपघातात संजय रतन पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने संजय पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघातात दोघे जखमी
दरम्यान, या अपघातात नाना सुखदेव बोबडे (58, रा.कोठली, ता.भडगाव ) व इम्रान खान (37, रा.भडगाव) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहे. मयत संजय पाटील यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. गेल्या 3 महिन्यांपूर्वी त्यांचे हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या अपघाती निधनाने कोठली परीसरावर शोककळा पसरली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !