सुनसगावातील सुदर्शन पेपर मिलच्या आगीत पाच कोटींचे नुकसान

50 बंबांद्वारे आगीवर नियंत्रण : इम्पोर्टेड रद्दी पेटल्याने आग


5 crores loss in fire at Sudarshan Paper Mill in Sunasgaon भुसावळ : पेपर बनवण्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावाजवळील सुदर्शन पेपर मिलमध्ये रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. रद्दी विभागात लागलेल्या आगीचे लोण तयार पेपर झालेल्या भागातही पोहोचल्याने सुमारे सातशे टन तयार माल जळून खाक झाला तर सुमारे बाराशे किलो इर्म्पोटेड रद्दी जळून खाक झाली. या आगीत सुमारे पाच कोटींवर रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पेपर मिलचे मालक राजीव नारायण चौधरी यांनी ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना दिली. आग विझवण्यासाठी जिल्हास्तरावरील पालिकांमधून बंबांना पाचारण करण्यात आले तर सुमारे 50 बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळाले तर काही भागात रात्री उशिरापर्यंत धुराचे लोट कायम होते.

इम्पोर्टेड रद्दी पेटल्याने आग
सुदर्शन पेपर मिलमध्ये ‘डुप्लेक्स’नावाचा महागडा पेपर तयार होतो. हा पेपर बनवण्यासाठी विदेशातील कच्चा माल (प्रेसिंग रद्दी) मागवण्यात येते. सुमारे बाराशे टन रद्दी पेपरच्या मिलच्या आवारात आणून पडली होती मात्र वाढते ऊनाच्या तीव्रतेने प्रेसिंग रद्दीच्या एका गठाणीला रविवारी सकाळी 10 वाजता आग लागली व पाहता-पाहता पेपराने लागलीच पेट घेतल्यानंत संपूर्ण मिलमध्ये आणीचा वणवा पसरला. रविवार असल्याने पेपर बंद असल्याने कामही बंद होते शिवाय तुरळक कर्मचारी आल्याने त्यांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वार्‍याचा जोर अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यास अनेक अडचणी आल्या. भुसावळसह जळगाव, दीपनगर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

पोलिसांनी केली आगीची पाहणी
आगीची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे हवालदार सुरज पाटील, तालुका पोलीस स्टेशनचे गणेश गव्हाळे, जगदीश भोई, विशाल विचवे, चालक राजू काझी, वीज वितरण कंपनीचे धांडे, सुनसगाव वीज वितरण कंपनीचे अभियंता देवयानी शेटे व वीज कर्मचारी, तलाठी जयश्री पाटील आदींनी धाव घेतली. आगीवर सात तासांच्या प्रयत्नांनी नियंत्रण आले असलेतरी आतून आग धुमसतच होती.

पाच कोटींचे नुकसान
सुदर्शन पेपर मिलचे मालक राजीव नारायण चौधरी यांच्या माहितीनुसार, आगीमुळे सुमारे पाच कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. त्यात 1200 टन रॉ मटेरीयल (रद्दी) जळाली तसेच 650 टन तयार माल (डुप्लेक्स पेपर), शंभर टन कोळसा, 35 टन पावडर तसेच चार हजार स्वेअर फूटचे शेड नष्ट झाले. आगीनंतर भुसावळ तालुका पोलिसांनी पाहणी केली असून सोमवारी नुकसानीबाबत तालुका पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !