पाणी आल्यानंतर पीन लावताना बसला इलेक्ट्रीक शॉक : शिरसाड गावातील 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू


45-year-old from Shirsad village dies of electric shock while planting after water comes यावल : तालुक्यातील शिरसाड या गावात सार्वजनिक नळाला आलेले पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटारीची पीन लावतांना शॉक लागल्याने प्रौढाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी बेशुद्धावस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

यावल पोलिसात नोंद
शिरसाड, ता.यावल या गावात रविवारी रात्री सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यात आला असता नळाला आलेले पाणी इलेक्ट्रिक मोटर लावून भरण्यासाठी गलीराम रामदास धनगर (45) हे धावपळ करीत मोटर सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विद्युत धक्का बसला आणि यात ते जमिनीवर कोसळले. त्यांना तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी भुगवाड्या यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात जितेंद्र धनगर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !