चोपडा तालुक्यातील तरुणी अत्याचारातून गर्भवती : आरोपीला अटक
Young woman in Chopda taluka found pregnant due to torture: Accused arrested चोपडा : चोपडा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी अत्याचार करण्यात आला व त्यातून ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडीतेने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर तो अडावद पोलिसात वर्ग करण्यात आला.
अडावद पोलिसात गुन्हा वर्ग
पीडीता व तिची आई ऊस तोड कामासाठी चोपडा तालुक्यातील एका गावात गेले असता तेथे 1 फेब्रुवारी ते 4 एप्रिलच्या दरम्यान सागर संजय मोरे (23, रा.मोढारे, प्रिंप्री प्र.ऊ., ता.पारोळा) याने ओळखीचा फायदा घेत पीडीतेच्या राहण्याच्या झोपडीत वेळोवेळी तिच्या सोबत शारीरीक संबंध ठेवल्याने पीडीता गरोदर राहिली. ही घटना कुणालाही सांगितली तर मरुन जाईल, अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा शून्य क्रमांकाने अडावद पोलिसात वर्ग करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास अडावदचे सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.


