गिधाडे तापी पुलावरून उडी घेत तरुणीची आत्महत्या


Girl commits suicide by jumping from Vulture Tapi bridge शिरपूर : शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथील तापी नदीपात्रात उडी घेत 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. शिवानी बाळु पाटील (19, जवखेडा, ता.शिरपूर) असे मयत तरुणीचे नाव आहे.

अचानक उडी घेत केली आत्महत्या
जवखेडा येथील तापी नदी पुलावर तरुणी आल्यानंतर तिने काही कळण्याआत उडी घेतली. घटनास्थळी प्रवासींनी बघितल्यानंतर तत्काळ शिवानी पाण्याबाहेर काढत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवानी पाटील हिचा मृत्यू झाला. तरुणीच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तापी पुलावर बॅग आणि कॉलेजचे आयडी कार्ड आढळले असून ते पोलिसांनी जप्त केले आहे.

 


कॉपी करू नका.