धरणगावात किरकोळ वादातून तरुणाला मारहाण


A young man was beaten up due to a minor dispute in Dharangaon धरणगाव : शहरातील एका तरुणाला काही जणांनी किरकोळ वादातून मारहाण केल्याप्रकरणी 60 ते 70 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भूषण सुरेश भागवत (32, भावे गल्ली, धरणगाव) यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिल्यानुसार सोमवार, 29 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घराकडे जात असतांना एका मोटरसायकलवर चार मुले भरधाव वेगात परीहार चौकाकडून धरणी भागाकडे जात असताना कट मारल्याने संबंधित दुचाकीवरील मुलांना गाडी एवढी जोरात का चालवताय?, असे विचारले. याचाच राग आल्याने संबंधित मुलं भूषण यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करुन मारहाण केली.

घरावर केली दगडफेक
यानंतर भूषण यांना कुटुंबीयांनी घरात घेत दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर ही संबंधित मुलांसोबत इतरांनी घरात घुसण्याचा प्रयत्न करत दरवाजावर दगडफेक करून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रात्री उशिरा जहीर (पूर्ण नाव माहित नाही) व त्याच्या सोबतच्या 60 ते 70 लोकांविरुद्ध भादवि कलम 143, 147. 323, 352, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश पाटील हे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !