लासगावातील विवाहितेची पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह आत्महत्या


Suicide of a married woman with a five-month-old child in Lasgaon पाचोरा : पाच महिन्यांच्या चिमुकल्याला छातीशी कवटाळत लासगावच्या विवाहितेने विहिरीत आत्महत्या केली. पाचोरा तालुक्यात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे तर आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मंगळवार, 30 मे रोजी ही घटना उघडकीस आली. लजीना बी आरीफ शेख (22, लासगाव, ता.पाचोरा) व असद शेख (पाच महिने) अशी मयतांची नावे आहे.

शेतशिवारातील विहिरीत आढळला मृतदेह
लासगाव, ता.पाचोरा येथील आरीफ शेख यांचा विवाह गावातीलच त्यांच्या मामाची मुलगी लजीनाबी यांच्याशी झाल्यानंतर दाम्पत्यास पूत्ररत्न झाले होते. शनिवार, 28 मे 2023 रोजी गावात समाज बांधवाचे लग्न असल्याने आरीफ शेखसह परीवार आमंत्रीत असल्याने आरीफ हे लग्नाला गेले तर पत्नीने मात्र काही वेळात येत असल्याचे सांगून लासगाव शिवारात आत्महत्या केली. दरम्यान, बराच वेळ होवूनही पत्नी येत नसल्याने आरीफ शेख यांनी घर गाठले मात्र पत्नी नसल्याने त्यांनी शोध सुरू केला तर दुसर्‍या दिवशी पाचोरा पोलिसात पत्नीसह मुलगा हरवल्याची नोंदही करण्यात आली मात्र मंगळवारी लासगावातील शेत-शिवारातील विहिरीत लजिनाबी व असद यांचा मृतदेह आढळून आला.

पोलीस अधिकार्‍यांची धाव
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ, पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, राहुल बेहरे, दिलीप वाघमोडे हे पथक व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल झाले. लजीनाबी आरीफ शेख व असद आरीफ शेख यांचे मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कॉपी करू नका.