विद्यार्थी झोपल्याची पाहून जळगावात चोरट्यांनी भरदिवसा लॅपटॉपसह मोबाईल लांबवला


जळगाव : जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील अजय कॉलनीत अभियंता तरुणाच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल, घड्याळसह रोकड लांबवण्यात आली. या प्रकरणी सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळा येथील मूळ रहिवासी तरुण सौरभ अनिल वाळेकर हा तरुण जळगाव शहरातील रींग रोड परीसरातील अजय कॉलनीत वास्तव्यास असून तो अभियंता आहे. सोमवारी दुपारी 3 ते 6 वाजेच्या दरम्यान सौरभ हा झोपला असताना त्याच्या खोलीतून त्याचा लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ तसेच अडीच हजार रुपये रोख असा एकूण 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला. सायंकाळी सहा वाजता उठल्यानंतर सौरभला चोरी झाल्याचे लक्षात आले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक शरीफ शेख हे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !