महिलांनो बस प्रवासात दागिणे सांभाळा : चोपडा तालुक्यातील विवाहितेचे दिड लाखांचे दागिने लांबवले


Thieves stole jewelery worth half a lakh from a married woman in Gujarat while traveling in a bus चोपडा : बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चोपडा तालुक्यातील चुंचाळेतील माहेर असलेल्या विवाहितेचे दिड लाखांचे दागिने लांबवले. शिरपूर ते चुंचाळे, ता.चोपडा दरम्यान बस प्रवासात ही घटना घडली या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोपडा पोलिसात गुन्हा दाखल
शुभांगी अतुल शिंदे (27, चुंचाळे, ता.चोपडा, ह.मु.वापी गुजरात) या महिल्या कामाच्या निमित्ताने 27 मे रोजी रोजी शिरपूर ते चुंचाळे असा बसमधून प्रवास करत असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधून एक लाख 51 हजार 247 रुपये किंमतीचे दागिने लांबवले. हा प्रकार लक्षात आल्याने महिलेने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र सोनवणे करीत आहे.

 


कॉपी करू नका.