तलवारीच्या धाकावर देव्हारीच्या तरुणाला मारहाण : दोघांविरोधात गुन्हा


Dewari youth assaulted with sword : Crime against both नशिराबाद : देव्हारी, ता.जळगाव येथील तरुणला जुन्या वादातूनतलवारीचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली तसेच तरुणासह कुटूंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात मंगळवारी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून मारहाण
राहुल भगवान पाटील (32, देव्हारी, ता.जळगाव) हा तरुण शेती करतो मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून गावातील रावसाहेब उर्फ गोलू रघुनाथ तायडे (देव्हारी) व नितीन उर्फ सोनू नामदेव पाटील (उमाळा) यांनी तरुणाला बेदम मारहाण केली तसेच तलवारीचा धाक दाखवत कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणाने नशिराबाद पोलिसात तक्रार नोंदवली. तपास सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.


कॉपी करू नका.